स्व.इंदिराजी गांधी यांचे देशाचे एकात्मतेसाठी बलिदान – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृत उद्योग समूहाच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

Sangmner vijay kapse दि ३१ ऑक्टोबर २०२६ देशातील गरिबी हटाव चा नारा देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी यांचे कणखर आणि खंबीर नेतृत्व देशाला मिळाले. बांगलादेशची निर्मिती बँकांचे राष्ट्रीयीकरण असे धाडसी निर्णय घेणाऱ्या इंदिराजींनी देशाच्या अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले. हे भारताच्या अखंडतेसाठी हुतात्मे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शक्ती स्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या 42 वा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत मा.नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले, रामहरी कातोरे, ॲड.नानासाहेब शिंदे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे,संतोष हासे, गुलाबराव देशमुख, अंकुश ताजने,रावसाहेब दुबे,बंडु नाना भाबड, मदन आंबरे,विजय राहणे, विलास कवडे, सिताराम वर्पे, जगन आव्हाड, प्राचार्य केशवराव जाधव,प्रा.बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्राचार्य व्ही.बी.धुमाळ, किरण कानवडे, कृष्णा दिघे, तात्या कुटे, सौ.सुंदराबाई दुबे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्व.इंदिरा गांधी हे देशाचे कणखर नेतृत्व होते. देशातील गरिबी हटाव नारा देण्याबरोबर,बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्यांनी बांगलादेशची निर्मिती करून जगाचा नकाशा बदलविला.भारत हा देश एक राहिला पाहिजे हा विचार त्यांनी कायम दिला. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी त्यांनी हुतात्मे पत्करले.
याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून देशाच्या एकात्मतेसाठी मोठे काम केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुमारे 40% देश हा विविध संस्थांमध्ये विभागला होता. या सर्व संस्थांना देशांमध्ये विलीनीकरणाचे काम त्यांनी केले. या थोर राष्ट्रपुरुषांचा विचार करून देशाची एकात्मता आणि अखंडता राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना स्वर्गीय इंदिराची गांधी यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल मोठा नितांत आदर होता. इंदिराजींच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी नवी दिल्लीच्या धर्तीवर अमृत उद्योग समूहामध्ये शक्तिस्थळ निर्माण केले आहे. दरवर्षी या ठिकाणी विविध तज्ञांची व्याख्याने आयोजित करून इंदिराजींना अभिवादन केले जाते. इंदिरा गांधी यांना लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाचे संस्कार मिळाले. राजकीय क्षेत्रात आल्यानंतर सुरुवातीला विरोधकांनी त्यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवले. मात्र जागतिक पातळीवर आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवणाऱ्या इंदिराजी ह्या देशाच्या कणखर पंतप्रधान ठरल्या असे त्या म्हणाल्या.
यावेळी स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदारभाई पटेल यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



