आपला जिल्हा

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ; संपूर्ण महाराष्ट्रात कामकाजाचा मार्ग मोकळा- नितिनराव औताडे 

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ; संपूर्ण महाराष्ट्रात कामकाजाचा मार्ग मोकळा- नितिनराव औताडे 
पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ; संपूर्ण महाराष्ट्रात कामकाजाचा मार्ग मोकळा- नितिनराव औताडे 
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३१ ऑक्टोबर २०२६ : अहील्यानगर जिल्यातील अग्रगण्य संस्था पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव या संस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संस्थेला संपूर्ण महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात कामकाज करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संस्थेचे सस्थापक नितिनराव औताडे यांनी दिली आहे.

जाहिरात
संस्थेचा सध्या कारभार नाशिक व पुणे विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये सुरू होता. संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे कार्यक्षेत्र वाढावे व संस्थेचा कारभार चालवा यासाठी संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, सर्व संचालक मंडळ संस्थेचे व्यवस्थापक सुभाष औताडे,सह व्यवस्थापक विठ्ठल घारे, आप्पासाहेब कोल्हे,श्री मोजड प्रयत्न करत होते.
संस्थेच्या दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या उपविधी दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रवाढीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १३ (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या उपविधी दुरुस्तीला अधिकृत मंजुरी दिली आहे.

जाहिरात
या मंजुरीमुळे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापुरते विस्तारित झाले आहे. यामुळे संस्थेला राज्यभरातील आर्थिक व्यवहारांचा विस्तार करण्याची आणि सहकार क्षेत्रातील आपले कार्य अधिक व्यापक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
 सभासदांच्या विश्वासातून उभ्या राहिलेल्या या संस्थेने 232 कोटींच्या टप्पा पार केला असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात 2 कोटी 64 लाख रुपये नफा झाला आहे .सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेने दिवाळीपूर्वीच 9 टक्के लाभांश वाटप सुरू केले असल्याचेही औताडे यांनी सांगितले.

नितिनराव औताडे
ही संस्था आता राज्यस्तरावर कार्यविस्ताराच्या दिशेने वाटचाल करणार असून, कार्यक्षेत्रवाढीचा निर्णय संस्थेच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे