आपला जिल्हा

कोपरगाव नगरपालिकेचे गट नेते प्रसाद आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना २५ गणवेशांचे वाटप

कोपरगाव नगरपालिकेचे गट नेते प्रसाद आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना २५ गणवेशांचे वाटप

कोपरगाव नगरपालिकेचे गट नेते प्रसाद आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना २५ गणवेशांचे वाटप

Kopargaon vijay kapse दि ३ नोव्हेंबर २०२६ : कोपरगाव नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते  प्रसाद आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना २५ गणवेशांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

जाहिरात

या कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सोनल अजमेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसादजी आढाव यांचे मित्रपरिवारातील परेश आढाव, इलियाज शेख, ओम दुसाने, रोहित कनगरे, दीपक गंगवाल, अर्जुन माकोने, आदित्य हादगे, गौरव आढाव, स्वराज सूर्यवंशी, भैया नागरे, सलीम अत्तार, पंकज आढाव व जोहिद कच्छी आदी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, तसेच सदस्य आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे, राजेश ठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रसादजी आढाव यांचे मित्र व संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अमोल अजमेरे म्हणाले की, प्रसादजी आढाव हे श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजातील तळागाळातील, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, ही भावना त्यांच्या मनात होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उदात्त विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या मित्रपरिवाराने वाढदिवसाचा हा सामाजिक उपक्रम विद्यालयात आयोजित केला आहे. अशा उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुरेंद्र शिरसाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिगंबर देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका सुजाता अजमेरे यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, अतुल कोताडे, निलेश बडजाते, संजय बर्डे, योगेश गवळे, पंकज जगताप, संजीवनी डरागे, रूपाली साळुंखे, शिल्पा अजमेरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक जाणीव जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मदतीचा हात देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात समाधानाची भावना निर्माण करणारा ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे