आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे–मा. मंत्री बाळासाहेब थोरात

२ स्वीपिंग मशीनसह १० नवीन घंटागाडी,६ ट्रॅक्टरचे लोकार्पण; ५ कोटींचे नवीन स्वच्छ व धुळमुक्त शहरासाठी वाहने

यशोधन कार्यालय येथे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने एक पणती स्वच्छतेची या उपक्रमांतर्गत २ स्वीपिंग मशीन, १० नवीन घंटागाडी, ५ जुन्या घंटागाडींचे रिवेनेशन, चार ट्रॅक्टर, दोन इतर वाहने अशा सुमारे ५ कोटींच्या वाहनांचे लोकार्पण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, मा.आ. डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, डॉ जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, डॉ संजय मालपाणी, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी , अरुण वाकचौरे, सभापती किशोर टोकसे, सौरभ कासार, नगरसेवक शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग ,नितीन अभंग ,किशोर पवार, डॉ दानिश पठाण , गणेश गुंजाळ, मुजीब खान पठाण ,अमजद खान पठाण, भारत बोऱ्हाडे , मालती डाके, शोभा पवार, सीमा खटाटे, अर्चना दिघे, विजया गुंजाळ ,डॉ अनुराधा सातपुते, प्राची काशीद, दिपाली पांचारिया, सरोजना पगडाल , प्रियंका शहा, नंदा गरुडकर , शकीला बेग ,जावेद पठाण, मुख्याधिकारी डॉ दयानंद गोरे, उपमुख्य अधिकारी संजय पेकळे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा,ॲड संग्राम जोंधळे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मा.आ डॉ सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्ष पदापासून आदर्शवत कामाची परंपरा सुरू झाली. सर्व नगरसेवक ,उपनगराध्यक्ष यांनी चांगले काम केले. सौ दुर्गाताई तांबे यांच्या काळामध्ये स्वच्छतेवर मोठे काम झाले म्हणून राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे संगमनेर नगरपालिकेला मिळाली. शिस्त व स्वच्छतेची संस्कृती संगमनेर शहरांमध्ये निर्माण झाली. नव्याने नगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या वाहनांच्या माध्यमातून धुळमुक्त व स्वच्छ संगमनेर साठी अधिक काम होणार आहे. शहरांमध्ये मूलभूत सुविधा चांगल्या असून नागरिकांना मुबलक पाणी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन करताना सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर दीपावलीच्या निमित्ताने शहर स्वच्छतेसाठी नगरपालिकेने घेतलेल्या उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील ९ महिन्यांमध्ये २.० अंतर्गत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. एक पणती स्वच्छतेची यामधून दोन स्वीपिंग मशीन मिळाले आहेत. मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष यांच्या सहकार्यातून राज्यातून संगमनेर नगरपालिकेला पहिले २.५ कोटींचे स्वीपिंग मशीन मिळाले आहे. याची पुढील ५ वर्षे जबाबदारी सरकारची असणार आहे. स्वच्छतेसाठी नव्याने कोणार्क कंपनीला ठेका देण्यात आले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पाहिलेले स्वच्छ व सुंदर संगमनेरचे स्वप्न यामधून साकार होणार आहे. दिवस-रात्र काम करून जनतेचा पैसा आम्ही वाचवतो .सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून निधी मिळवतो. नवीन भाजी मार्केट सुरू झाली आहे. नऊ ठिकाणी फूड कोर्ट उभे झाले आहे. आगामी काळामध्ये शून्य टक्के कचरा व सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ०% विज बिल करण्याचा निर्धार असल्याचे संगत नव्याने राबवण्याच्या विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली.
मा. आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, नवीन स्वीपिंग मशीनच्या माध्यमातून ४० किलोमीटर रस्ता स्वच्छतेचे काम एका दिवसात होणार आहे .यामुळे स्वच्छ शहर अशी ओळख निर्माण होईल. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर दुर्गा तांबे म्हणाल्या की , मागील नगराध्यक्षांचे काम परंपरा आपण पुढे नेली.दादांनी स्वच्छ संगमनेर ,सुंदर संगमनेर ,गार्डन सिटी हे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याचे काम आपण केले. ओला कचरा व सुका कचरा ही संस्कृती जनतेमध्ये रुजवली. केंद्र व राज्य सरकारची अनेक बक्षिसे मिळाली राष्ट्रपतींकडून १० कोटीचे बक्षीस तर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ही सन्मान झाला. नव्याने ३७ गार्डन शहरांमध्ये निर्माण केली आहेत या सर्व कामांमध्ये सर्व सफाई कर्मचारी व नागरिकांचाही मोठा सहभाग राहिला असल्याच्या त्या म्हणाल्या
डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की , लोकनेते बाळासाहेब थोरात , आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत आहे. सुमारे पाच कोटींची विविध वाहने स्वच्छतेसाठी काम करणार असून पहाटपासून स्वच्छता कर्मचारी काम करतात या सर्व कामांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी व्यापारी नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मैथिली तांबे यांनी केले तर उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी आभार मानले.
निधी कसा आणायचा ते आम्हाला माहिती
विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार तांबे
संगमनेर मधील धूळ मुक्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीमधून राज्यांमधून फक्त संगमनेर शहरासाठी 2.5 कोटींचे स्वीपिंग मशीन आले. मशीन निधी याबाबत विरोधकांना माहिती सुद्धा नाही. मशीन आल्यावर हे जागे झाले. आम्ही जनतेसाठी काम करतो. फुकटच्या कामाचे श्रेय घेऊ नका. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते असे सांगताना निधी कसा आणायचा व चांगली विकास कामे करण्याचे आम्हाला चांगले ठाऊक असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून यावेळी विरोधकांना ठणकावले आहे.



