के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या आयुष पोकळेला राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदक
के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या आयुष पोकळेला राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदक
के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या आयुष पोकळेला राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदक

Kopargaon vijay kapse दि ५ नोव्हेंबर २०२६– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय १७ व १९ वर्षे वयोगटाच्या शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा ०३ ते ०५ नोव्हेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू आयुष पोकळे याने पुणे विभागाचे नेतृत्व केले. व तेथील स्पर्धेत १९ वर्षे वयोगट मुलांच्या क्रीडा प्रकारात पुणे विभागास सिल्वर मेडल मिळवून देण्यास मोलाची कामगिरी बजावली. शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत पुणे विभागास सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील या घौडदौडीबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





