आपला जिल्हा

केंद्रीय सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्या हस्ते एन एच इ सीचे पुनरुज्जीवनामुळे स्व.कोल्हे यांच्या स्वप्नांना नवसंजीवनी

केंद्रीय सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्या हस्ते एन एच इ सीचे पुनरुज्जीवनामुळे स्व.कोल्हे यांच्या स्वप्नांना नवसंजीवनी
साखर कारखान्यांच्या मशिनरी उत्पादनांत नॅशनल हेवी इंजिनियरींगचे महत्वपुर्ण योगदान – आमदार विवेक कोल्हे.
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ नोव्हेंबर २०२६  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या विकासाला प्राधान्य देत सुसंगत ध्येयधोरणे राबविली, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या बळकटीकरणासाठी पुणे येथील नॅशनल हेवी इंजिनियरींग या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुर्ननिर्माण कार्यासाठी दीड हजार कोटी रूपयांची मदत करून त्याचे भूमिपुजन केले ही बाब साखर कारखान्यांच्या मशिनरी उत्पादनांत महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या उददेशात यामुळे अधिक भर पडली असेही ते म्हणाले.रविवारी देशाचे पहिले सहकारमंत्री नामदार अमित शहा यांच्या हस्ते तळेगांव दाभाडे (पुणे) येथे नॅशनल हेवी इंजिनियरींग बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुर्ननिर्माण प्रकल्पाचे भूमिपुजन पार पडले.

जाहिरात
           आमदार विवेकभैय्या कोल्हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ज्येष्ठ अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, यशवंतराव चव्हाण, यांनी ग्रामिण अर्थकारण सुधारून शेतकऱ्यांचा आर्थीक पाया भक्कम व्हावा यासाठी सहकार क्षेत्राची स्थापना केली.संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजी सहकारमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करत सहकारात सर्वप्रथम १९७४ मध्ये नॅशनल हेवी इंजिनियरींग कंपनीची स्थापना करून साखर कारखानदारीला लागणा-या मशिनरींसह स्वदेशी तंत्रज्ञानाची कमी खर्चात अधिक कार्यक्षम असणा-या आधुनिक तंत्रज्ञानाची निर्माती करत राज्यासह देश विदेशात मशिनरी पुरविली, मात्र मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना नॅशनल हेवी इंजिनियरींग संस्था करू शकली नाही. तळेगांव दाभाडे (पुणे) येथील ११० एकरातील ही संस्था सन २०११ मध्ये बंद पडली.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सन २०१६ पर्यंत त्याच्या पुर्ननिर्माण कार्यासाठी मोठे प्रयत्न केले पण त्यांना अर्धांगवायुचा त्रास झाल्याने या कार्यात अडथळा आला.

जाहिरात
आजोबांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून सहकारी साखर कारखानदारीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असणांरी नॅशनल हेवी इंजिनियरींग कंपनी पुन्हा सुरू करावी म्हणून आग्रह धरला आणि त्याला १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुर्त स्वरूप प्राप्त झाले.आता येथे वर्षभरात नव्याने साखर कारखान्यांसाठी लागणा-या बॉयलर, इथेनॉल सयंत्रे, कंटेनर आदि मशिनरींचे उत्पादन होणार आहे हा संकेत सहकारक्षेत्राच्या बळकटीकरणांसाठी शुभशकुन मानला गेला आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी देशातील ८ लाख सहकारी संस्थेच्या कामकाजात सुसूत्रपणा आणत संगणकासह आधुनिक तंत्रज्ञानाचा अमुलाग्र वापर करून ग्रामिण भागात सहकार क्षेत्राचे जाळे अधिक विस्तीर्ण व्हावे म्हणून  काम सुरू केले याया आम्हांला विशेष अभिमान आहे. नॅशनल हेवी इंजिनियरींग ही संस्था सहकार क्षेत्रात नावांजलेली व्हावी यासाठी आपणही जाणिवपुर्वक जबाबदारीने काम करू, अत्यंत कमी वयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनांखाली त्यासाठी संधी मिळाली त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास आमदार विवेक कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे