आ.विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नातून हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग,दुसऱ्या टप्प्यात १०० नवीन लोखंडी फळ्या दाखल
आ. विवेक कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, दुसऱ्या टप्प्यात नवीन १०० फळ्या उपलब्ध
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १७ नोव्हेंबर २०२६–कोपरगाव तालुक्यातील जलसंधारण आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनदरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, दुसऱ्या टप्प्यात बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आणखी १०० नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळणार आहे.
जाहिरात
कोपरगाव मतदारसंघातील विविध बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आमदार कोल्हे यांच्या प्रयत्नांतून एकूण ७ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १ कोटी १० लाख रुपये हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध झाले आहेत. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ३५ नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या होत्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० फळ्या उपलब्ध झाल्याने पाणी अडविण्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या कामाला चालना मिळाली आहे.जाहिरात
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला पहिला बंधारा म्हणून हिंगणी बंधाऱ्याला ऐतिहासिक आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि संरचनात्मक मजबुतीकरण पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक जलसाठा निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग करता येणार आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे अत्यंत गरजेचे आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच भूजल पातळी सुधारण्यास आणि परिसरातील जलस्रोत बळकट होण्यास मदत होणार आहे. मंजूर निधीतून इतर बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामेही टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत.जाहिरात
हिंगणी बंधाऱ्याच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी जपूया, शेतीला बळ देऊया आणि कोपरगावच्या विकासाला गती देऊया, हा या कामामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.