आपला जिल्हा

वारीत अवैध तलवार बाळगणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांची कारवाई

 वारीत अवैध तलवार बाळगणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांची कारवाई

 ५ हजार रुपये किमतीची २४.५ इंच लांबीची तलवार जप्त; २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ नोव्हेंबर २०२६ : तालुक्यातील वारी येथे अवैधरीत्या तलवार बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ हजार रुपये किमतीची २४.५ इंच लांबीची तलवार जप्त केली असून, शिवाजी दादू कोतकर (वय २८, रा. वारी, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना वारी गावातील एक व्यक्ती कमरेला तलवार लावून गावात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस पथकाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

जाहिरात

त्यानुसार पोलीस पथकाने वारी गावात जाऊन संशयिताचा शोध घेतला असता, तो मशिदीच्या गेटसमोर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५ हजार रुपये किमतीची २४.५ इंच लांबीची तलवार मिळून आली. पोलिसांनी सदर तलवार जप्त करून शिवाजी दादू कोतकर याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२२/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार रघुनाथ कारखिले, अंबादास वाघ, नवनाथ गुंजाळ, राम खरातोडे, रशीद शेख व चालक नवनाथ जाधव यांचा समावेश होता.अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात लक्ष वेधले गेले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे