मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेबांचे विचार हीच आपली खरी ताकद : माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे
मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेबांचे विचार हीच आपली खरी ताकद : माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे
Kopargaon vijay kapse दि १७ नोव्हेंबर २०२६-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कोपरगाव शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जाहिरात
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेते नव्हते, तर सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमान जागवणारे झंझावाती विचार होते. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे विचार हीच आपली खरी ताकद आहे.
या अभिवादन कार्यक्रमास कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलासभाऊ जाधव, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, शिवसेना शहरप्रमुख अक्षय जाधव, माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे, कुकूशेठ सहानी, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, दिलीपराव आरगडे, मकरंद जोशी, सोमनाथजी शिंगाडे, विक्रांत झावरे, शेखरभाऊ कोलते, राहुल देशपांडे, सुनील साळुंखे, नरेंद्र बैरागी, रवी खिल्लारे, अभिषेक आव्हाड, सतीश लोळगे, श्रीपाद भसाळे, विशाल झावरे, पांडुरंग देवरे, रवींद्र खिल्लारे, बबन जोगदंड, अशोक पवार, ललित ठोंबरे, अशोक अस्गे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे सभासद उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांना अभिवादन केले.जाहिरात