आपला जिल्हा

वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणू नका; शेतकरी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्या – राजेश परजणे पाटील यांचे आवाहन

वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणू नका; शेतकरी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्या – राजेश परजणे पाटील यांचे आवाहन

रविवार दि २२ नोव्हेंबर रोजी राजेश परजने यांचा वाढदिवस

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६– वाढदिवस हा केवळ आनंदोत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि माणुसकी जपण्याचा दिवस ठरावा, या भावनेतून रविवार दि २२ नोव्हेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या औपचारिक भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन नामदेवराव परजणे पाटील गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश नामदेवराव परजणे पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी बांधवांच्या आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांची ओढाताण लक्षात घेता, वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा आपला मानस असल्याचे परजणे पाटील यांनी म्हटले आहे.

जाहिरात

औपचारिक सत्कार व भेटवस्तूंऐवजी शेतकरी बांधवांना पशुखाद्य, चारा अथवा शेतीसाठी उपयुक्त वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी. तसेच गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर आणि शैक्षणिक उपयोगाच्या वस्तू भेट देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यापेक्षा वाढदिवसाचा दुसरा कोणताही आनंद मोठा असू शकत नाही. त्यामुळे यंदाचा वाढदिवस केवळ आनंदोत्सव न ठेवता सामाजिक संवेदना, सहकार्य आणि माणुसकीचा उत्सव बनवूया, असेही त्यांनी आपल्या आवाहनातून स्पष्ट केले आहे.

आपले प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव असेच राहू द्या, हीच अपेक्षा व्यक्त करत राजेश नामदेवराव परजणे पाटील यांनी सर्वांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे