आपला जिल्हा

कार्तिकी एकादशीनिमित्त येवला तपोभूमीत भक्तिमय सत्संग सोहळा

कार्तिकी एकादशीनिमित्त येवला तपोभूमीत भक्तिमय सत्संग सोहळा

१०० बाल वारकऱ्यांच्या दिंडीने वेधले लक्ष; संत परमानंद महाराजांचे संतवचनपर मार्गदर्शन

जाहिरात

Yeola vijay kapse दि २३ नोव्हेंबर २०२६ : कार्तिकी एकादशीनिमित्त आत्मा मालिक ध्यान योग मिशन, कोकमठाण आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तपोभूमीत भव्य सत्संग सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात पुरणगाव गुरुकुलातील १०० बाल वारकऱ्यांच्या दिंडीने विशेष आकर्षण निर्माण केले.

बाल वारकऱ्यांनी दिंडी, हरिपाठ, रिंगण सोहळा, भजने, भारुडे आणि नगरप्रदक्षिणेत उत्साहाने सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

जाहिरात

यावेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, प्रभावती माई आणि हनुमंतराव भोंगळे यांनी संतवचनपर मार्गदर्शन करताना आध्यात्मिक विचार, सदाचार आणि भक्तिमार्गाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी ब्रह्मांडानंद महाराज, सार्थकानंद महाराज, कंकाली महाराज आणि संत सेवादास महाराज यांची उपस्थिती होती.

गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्राचार्य राजेश पाटील, मुख्याध्यापक राहुल नरोडे, तुषार कापसे, विभागप्रमुख प्रसाद वाघ, संकुलप्रमुख प्रकाश भामरे, कार्यालयीन अधीक्षक प्रमोद शेलार, आशिष मगर, वसतिगृह अधीक्षक बाळू कानडे, संगीत विभागप्रमुख अंबादास शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे