आपला जिल्हा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार – आमदार विवेक कोल्हे

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार – आमदार विवेक कोल्हे

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार – आमदार विवेक कोल्हे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ नोव्हेंबर २०२६: आत्मा मालिक ध्यानपीठामुळे कोपरगावचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. या पवित्र ध्यानपीठासाठी स्वागत कमान उभारणीचे काम मार्गी लावता आले, याचे मोठे समाधान आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने या परिसरातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.

जाहिरात

सावळीविहीर ते कोपरगाव महामार्गावर उभारण्यात आलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भव्य स्वागत कमानीचे लोकार्पण आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत परमानंद महाराज आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरात

आमदार कोल्हे म्हणाले की, कोल्हे परिवाराच्या तीन पिढ्यांपासून आत्मा मालिक ध्यानपीठाशी स्नेहाचे संबंध आहेत. सद्गुरू माऊलींचे कृपाशीर्वाद सदैव पाठीशी असल्याने स्वागत कमानीचे काम पूर्ण झाल्याचा विशेष आनंद आहे. ध्यानपीठाच्या माध्यमातून देश-विदेशात मौन आणि ध्यानाचा प्रचार-प्रसार केला जात असून आत्मशांतीसाठी जगभरातून भाविक येथे येतात. आगामी कुंभमेळ्याच्या काळात परिसरातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी होणार असून ही स्वागत कमान त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरेल.

संत परमानंद महाराज यांनी आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य स्वागत कमानीचे काम पूर्णत्वास गेल्याचे सांगितले. कमानीचे लोकार्पण हा आश्रमातील संत, साधक आणि सेवकांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संज निजानंद महाराज, संस्थेचे सचिव बाळासाहेब गोर्डे, कोषाध्यक्ष भगवंत होन, विश्वस्त हनुमंत भोंगळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संभाजी रक्ताटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी स्वागत केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे