साई कॉर्नर येथील पाण्याच्या टाकीला परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ नाव देण्याची मागणी
साई कॉर्नर येथील पाण्याच्या टाकीला परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ नाव देण्याची मागणी

कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑगस्ट २०२५– कोपरगाव शहरात असणाऱ्या साईबाबा कॉर्नर या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीला परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नाव देण्यात यावे या आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना सोमवार दि ११ ऑगस्ट रोजी शुक्र भक्तांनी देत केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या विषयाचे निवेदन अगोदरही कोपरगाव नगरपालिकेला देण्यात आले होते त्याच दिलेल्या निवेदनाचा आधार घेऊन या विषयाचा ठरावही काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेने केलेला आहे, परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी आज पर्यंत झालेली नाही म्हणूनच आठवण म्हणून शुक्र भक्तांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जगताप यांना निवेदन देत सदर पाण्याच्या टाकिला परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नामकरण पुढील ८ दिवसात द्यावे अशी विनंती वजा मागणी करत जर तसे झाले नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.


सदरच्या ण्याच्या टाकीला कलर देण्यात आलेला आहे व त्या टाकीत पाणी सोडलेले आहे त्यामुळे काही ठिकाणी कलरचे पोपडे निघत असल्या कारणामुळे हे काम होऊ शकले नाही परंतु लवकरच कलरची दुरुस्ती करून या पाण्याच्या टाकीला परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नाव देण्यात येईल.सुहास जगतापनगरपरिषद मुख्याधिकारी



