आपला जिल्हा

नामको कालव्याच्या अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार-आ.आशुतोष काळे

नामको कालव्याच्या अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार-आ.आशुतोष काळे

नामको कालव्याच्या अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार-आ.आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि १९ जानेवारी २०२६ कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातून जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका व  आणि लघु वितरीकांसाठी तळेगाव मळे आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या मात्र खरेदी झालेली नाही. त्यामुळे अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.त्याबाबत या शेतकऱ्यांनी नुकतीच आ.आशुतोष काळे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली असता जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिली आहे.

जाहिरात

कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातून जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व वितरिका क्रमांक २ च्या वितरिका आणि लघु वितरीकांसाठी २००३ साली तब्बल २२ वर्षापूर्वी तळेगाव मळे गावातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या उजव्या बाजूने ६.३१ हेक्टर आर व ७८ आर असे एकूण ७.०९ हेक्टर जमीनी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. मात्र सदरच्या जमिनीची खरेदी न झाल्यामुळे त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आजवर या शेतकऱ्यांनी अनेक वेळा पत्र व्यवहार व पाठपुरावा केला परंतु त्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

जाहिरात

महाराष्ट्र शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने देखील राहीलेल्या भू-संपादनासाठी निधी मिळावा अशी मागणी केलेली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी माणिकराव आहेर,नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याचे कार्यकारी अभियंता गुजरे यांच्या समवेत बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे मुल्यांकन निश्चित करण्यात आले होते. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी तीन महिन्याच्या आत सरळ खरेदी करून त्यांच्या मोबदल्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेशही पाटबंधारे विभागाला मा.जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी झाल्या नाहीत त्यामुळे खात्यात अद्याप मोबदल्याची रक्कम जमा झालेली नाही व शेतकरी मोबदल्यापासून वंचित असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आणून दिले.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांनी सर्व शेतकऱ्यांची सविस्तर माहिती जाणून घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून तुमचा प्रश्न मार्गी लावून जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळवून देणार तसेच धोत्रे, घोयेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करून जमिनी अधिग्रहीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही होवून त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिली आहे. यावेळी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार तसेच प्रकल्पबाधित शेतकरी मंजाहारी टूपके, दिगंबर टूपके, नसीर सय्यद आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे