आपला जिल्हा

संजीवनीच्या ७ विद्यार्थ्यांना  तैवान, जर्मनी आणि जपान मध्ये इंटर्नशिपची शिष्यवृत्तीसह  संधी

संजीवनीच्या ७ विद्यार्थ्यांना  तैवान, जर्मनी आणि जपान मध्ये इंटर्नशिपची शिष्यवृत्तीसह  संधी


                        संजीवनी  इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नांमुळे यश  

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० जुलै २०२६संजीवनी फार्मसी महाविद्यालय  आणि संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या सात विद्यार्थ्यांची  संजीवनी  इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नांमुळे  तैवान, जर्मनी आणि जपानमधील नामांकित विद्यापीठांमध्ये तीन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. तर एका विद्यार्थिनीची जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना  तेथील विद्यापीठांच्या वतीने शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
 यापूर्वी संजीवनीच्या सुमारे २५० विध्यार्थ्यांना  तैवान, कॅनडा, फिलिपाईन्स, ट्युनिशिया , युनायटेड किंगडम, इत्यादी देशांमधील  नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली. आता संजीवनीच्या   सई प्रकाश रासकर हिची तैवानमधील आय-शौ युनिव्हर्सिटीमध्ये, ईश्वरी भाऊसाहेब अनुसे आणि  कल्याणी जयवंत घोगळ  यांची तैवानमधील चांग गुंग युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली. तसेच रोहित जयवंत घोगळ याची जर्मनीतील बर्लिन स्कूल ऑफ बिझनेस अँड इनोव्हेशन येथे निवड झाली आहे. गायत्री भाऊसाहेब शिंदे हिची तैवानमधील प्रॉव्हिडन्स युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. प्रथम चंद्रशेखर गाडे  याची टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये निवड झाली आहे. तर धनश्री प्रणील चैधरी हिची एमएससाठी जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड येथे निवड झाली आहे.

जाहिरात

    संस्थेचे अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते इंटर्नशिप आणि उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा  व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  उच्च शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करावी, हे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. आज आपल्या विद्यार्थ्यांनी  विविध देशांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळवत स्व. कोल्हे यांनी  बघितलेलं स्वप्न साकार केलं. आपला विद्यार्थी सातासमुद्रापार इंटर्नशिप किंवा उच्च शिक्षणासाठी जातो, तेव्हा आमची मान अभिमानाने उंचावते. फक्त आमचा विध्यार्थ्यांना  कायम एक आग्रह असतो की,  परदेशांमध्ये भारतीय विध्यार्थ्यांसाठी मोठ्या  संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांनी   परदेषी भाषा आत्मसात करायला प्राधान्य द्यावे. विध्यार्थ्यांच्या  हिताला प्राधान्य देण्यासाठी संस्थेची स्वायत्तता खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे  उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्याचे स्वातंन्न्य मिळुन त्यांना  अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते.  संजीवनी कायमच दर्जेदार शिक्षण देत आहे. याच बळावर बळावर आता संजीवनीला एनआयआरएफ रॅंकींगमध्ये  देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याचे आमचं ध्येय आहे. –  अमित कोल्हे,   मॅनेजिंग ट्रस्टी

जाहिरात

इंटर्नशीपसाठी निवड झाल्यानंतर बोलताना कल्याणी घोगळ म्हणाली की, परदेशातील नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे  स्वप्न असते. मला तैवानमधील चांग गुंग युनिव्हर्सिटी येथे इंटर्नशिपची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हे यश मिळविण्यामागे माझ्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरलं. दरम्यान, या सत्कार सोहळ्यास  डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डॉ. विपुल पटेल, डॉ. आर . एस . शेंडगे, डॉ. एम. बी. गवळी, डॉ. एम. ए. जावळे, प्रा. एन. वाय. सिद्दीकी, डॉ. प्रेरणा जाधव आदी उपस्थित होते.

अमित कोल्हे यांनी इंटर्नशिपसाठी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले समुह छायाचित्र.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे