आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित विज्ञान, संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कार्यक्रम

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित विज्ञान, संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कार्यक्रम

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित विज्ञान, संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कार्यक्रम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० जुलै २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम.), कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष विज्ञान, संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विभागातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. २९) उद्बोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच करिअरविषयक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कौशल्यविकासाचे विविध उपक्रम राबविले जात असून अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख करून देण्यासाठी ब्रिज कोर्सची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, जबाबदारी आणि पालकांनी दिलेल्या संस्कारांचे पालन हे यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे गुण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात

यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी विकास मंडळ, परीक्षा विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शॉर्ट टर्म कोर्सेस, संशोधन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), सांस्कृतिक विभाग, एनसीसी, ग्रंथालय, जिमखाना, प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शन तसेच महिला अत्याचार प्रतिबंधक समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तेजस्विनी गायकवाड, कल्याणी शिंदे आणि अविनाश भागवत यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून महाविद्यालयीन शिक्षणाबाबतच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी करून दिला. कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांच्यासह विज्ञान, संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विभागातील सर्व प्राध्यापक आणि नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रुती पाटील व प्रा. प्रियंका पवार यांनी केले, तर आभार प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे