आपला जिल्हा

स्वच्छ- हरित वारीत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचा कौतुकास्पद सहभाग

स्वच्छ- हरित वारीत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचा कौतुकास्पद सहभाग

स्वच्छ- हरित वारीत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचा कौतुकास्पद सहभाग

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० जुलै २०२६     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यात ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या पायी दिंडी सोहळ्यात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रज्वल विकास नरोडे आणि रोहित धनंजय जोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

जाहिरात

राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडी’ अंतर्गत महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थी गटाचे यशस्वी नेतृत्व केले. पंढरीच्या पायी वारीदरम्यान भाविकांच्या आरोग्याची निगा राखणे, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, वारीचे उत्कृष्ट नियोजन आणि वारकऱ्यांचे आरोग्य राखने अशी विविध जबाबदारीची कामे त्यांनी निष्ठापूर्वक पार पाडली. केवळ आरोग्य व स्वच्छतेवरच न थांबता, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या स्वयंसेवकांनी कडेपठार येथे भव्य वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला. याशिवाय पालखी सोहळ्यात माऊलींच्या जयघोषात तल्लीन होऊन अभंग, भक्तिगीते आणि भारुड सादरीकरण करून  वारकऱ्यांची मने जिंकली.

जाहिरात

स्वयंसेवकांच्या या सामाजिक व उल्लेखनीय सहभागाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य व संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांच्या हस्ते स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल पोटे व प्रा. भीमराव रोकडे उपस्थित होते. स्वयंसेवकांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रा. विनोद मैंद यांचे विशेष सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे