आपला जिल्हा

डॉ सुजय विखे पाटील पोहोचले थेट भुईमुगाच्या शेतात

डॉ सुजय विखे पाटील पोहोचले थेट भुईमुगाच्या शेतात
डॉ सुजय विखे पाटील पोहोचले थेट भुईमुगाच्या शेतात
जाहिरात

राहाता विजय कापसे दि २२ जुन २०२५माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचे काम करीत होत्या. या महिलेने अतिशय साधेपणाने डॉ सुजय विखे पाटील यांना “या ना शेतात… थोड्या शेंगा खा!” म्हणून बोलावले असता डॉ विखे पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता तिथेच आपली गाडी थांबवत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत शेंगा खाण्याचा आनंद घेतला.

जाहिरात

या विषयी डॉ विखे पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या साधेपणात आणि स्वागतात असणारी आपुलकी यावेळी मनाला खूप भावली. शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो. दरम्यान शेतात गेलो, जमिनीवर बसलो, मातीचा गंध घेतला आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिला.

जाहिरात
यावेळी पीक, पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या. ही फक्त एक भेट नसून माणुसकीची, मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती. एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली असल्याची भावना डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे