आपला जिल्हा

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने  लोकसभा निवडणूक मतदान स्पर्धेचे आयोजन- मुख्याधिकारी जगताप

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने  लोकसभा निवडणूक मतदान स्पर्धेचे आयोजन- मुख्याधिकारी जगताप
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने  लोकसभा निवडणूक मतदान स्पर्धेचे आयोजन- मुख्याधिकारी जगताप
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ मे २०२४- कोपरगाव शहरातील गणपती व दुर्गादेवी उत्सव मंडळे, सार्वजनिक व्यायाम शाळा, सामाजिक संस्था, विविध क्लब, रहिवासी कॉलनी व बचत गट आपणास आवाहन करण्यात येते की दि.१३ मे २०२४ सोमवार रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान होणार आहे. त्यादिवशी आपण आपल्या भागातील मतदान केंद्राची निवड करून तेथे  ७५% च्या पुढे मतदान कसे होईल याकरिता प्रयत्न करावेत. ज्या मतदान केंद्रावर ७५% पेक्षा जास्त मतदान होईल त्या पहिल्या ३ मतदान केंद्राकरिता रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र कोपरगाव नगरपरिषदेमार्फत देण्यात येईल अशी माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी सांगितले आहे.

जाहिरात
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी असून तरी  स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आकर्षक पारितोषिक मिळवा या करिता  सहभागी होण्यासाठी दिलेल्या गुगल फॉर्म च्या लिंक मध्ये https://forms.gle/uDmzyHYtwcWpcdEx8  माहिती भरावी तरी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक  सुहास जगताप यांनी केले आहे.
जाहिरात
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्वच मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान कसे होईल या करिता प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करणार.
सुहास जगताप
मुख्याधिकारी तथा प्रशासक
कोपरगाव नगरपरिषद
मुख्याधिकारी जगताप

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे