शिवसेना

युवा सैनिक गगन हाडा यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

युवा सैनिक गगन हाडा यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
युवा सैनिक गगन हाडा यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ जुलै २०२४महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै रोजी असलेला ६४ वा वाढदिवस सबंध राज्यभरात मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा केला गेला असून त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरात देखील युवासैनिक गगन हाडा यांच्यावतीने कोपरगाव विविध सामाजिक उपक्रम राबवत आपल्या आवडत्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या.

युवासैनिक गगन हाडा यांच्यावतीने कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहा मधील विद्यार्थ्यांना पावभाजीचे जेवण दिले तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात बीपी तपासणी व तापमान तपासणीचे मशीन भेट म्हणून देण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांना राजगिरा लाडू चे वाटप केले आदी विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला.

जाहिरात
 याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे, शहरप्रमुख राखी विसपुते, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी शहर प्रमुख भरत मोरे, असलम शेख, बालाजी गोर्डे, कान्हा हाडा, निखिल कंक्राळे, राहुल हाडा, विनय टाक, गौतम निजणे, रितेश वाडीले, रियान शेख, प्रथमेश आभाळे, स्वप्नील निरभवणे, प्रतीक मोरे, वरूण टाक, समीर पटवेकर आदी कोपरगाव शहर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गगन यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, कोरोना काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून साहेबांनी काम केले तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा, दिन-दुबळ्या सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत राज्य विकासाकडे घेऊन जाण्याचे महत्त्वाचे काम ठाकरे यांनी केले असून अशा  या आमच्या कुटुंबप्रमुखास समस्त कोपरगावकरांच्या वतीने मी वाढदिवसाच्या निरोगी आरोग्यदायी शुभेच्छा देतो.

युवासौनिक हाडा

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे