शिवसेना

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ जुलै २०२४कोपरगाव शहरात  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षा रोपण,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप रुग्णांना फळे वाटप असे विविध उपक्रम शिवसेना युवसेना यांच्या वतीने साजरा केला जातो.

जाहिरात
 यावर्षी देखील शिवसेना युवा सेनेचे शेखर कोलते सिद्धांत शेळके, नितेश बोरुडे यांनी पुढाकार घेत शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील लायन्स मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिष्ठान्न भोजन देवून या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करत उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

जाहिरात
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कैलास जाधव, प्रमोद लभडे, शिवाजी ठाकरे, श्रीरंग चांदगुडे, भरत मोरे, दिलीप अरगडे, प्रकाश शेळके,  कलविंदरसिंग दडियाल, सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, कालूआप्पा आव्हाड, बालाजी गोर्डे, सोमनाथ लोहकरे, प्रवीण शिंदे, राजू कपोते,  सचिन आढाव, सोनू आव्हाड, शेखर बोरावके, माधव आहेर, अमोल भालेराव, शिवम नागरे, वसीम पटेल, रुपेश सीनगर, रवी कथले, नितीन घुगे, अमजद शेख, वैभव गीते, सतीश शिंगाणे, बाळासाहेब साळुंके, शेखर कोलते, विकास शर्मा, गगन हाडा, प्रफुल शिंगाडे श्रीपाद भसाळे, मधु पवार, वर्षाताई शिंगाडे, अश्विनी होने आदी सर्व कोपरगाव शहर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे