एस जी विद्यालय कोपरगाव
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १५ मार्च २०२४– कोपरगाव शहरातील प्रसिद्ध श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने शोभा चंद्रकांत ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर शोभा दिलीपकुमार अजमेरे, सोनल अमोल अजमेरे, रिता सचिन अजमेरे अर्चना संदीप अजमेरे, रेखा अजमेरे, हेमा अजमेरे आदीच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
प्रारंभी विदयालयाचे आराध्य दैवत कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या निमित्तानं शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महीला तसेच सांकृतिक क्षेत्रातआपल्या कर्तुत्वाची छाप उमटवणाऱ्या महिलांना त्यांच्या उत्तम कार्याचा विद्यार्थ्यांपुढे प्रेरणास्त्रोत व्हावा या उद्देशाने विदयालयांत आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रसंगी विदयार्थीना शिक्षण विस्तार अधिकारी धट मॅडम यांनी मार्गदर्शन केले.उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी पाहुण्याचा परीचय करुन दिला.डॉ.अंजली फडके यांनी भगवतगीतेच्या श्लोकाद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.अॕड.मेघा लोढा यांनी देखिल मार्गदर्शन केले. रेणुका प्रसाद नाईक,पूनम विसपुते,पूजा प्रसाद कातकडे,राखी मनोज विसपुते,स्नेहा अतिश बोरुडे, अंजली पहाडे, शुभांगी अमृतकर, सुवर्णा अमृतकर, सुनंदा संजय दराडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीनाताई पाटणी, एम.के.आढाव विदयालयांच्या मुख्याध्यापिका भावना गवांदे,कोपरगांव पोलीस महीला कॉन्स्टेबल सुनंदा संजय दराडे, डॉ. काजल गलांडे, कोपरगांव नगरपालिकेच्या अधिकारी श्वेता शिंदे, नुपूर शेळके, वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना जगमोहन चिकटे,डाॕ.सुषमा आचार्य,डाॕ.दिपाली आचार्य, विदयालयांच्या ज्येष्ठ शिक्षिका राजश्री बोरावके,कल्पना महानुभव आदी मान्यवर महिला या वेळी उपस्थित होत्या.
विदयालयाच्या पर्यवेक्षिका उमा रायते यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले. यावेळी विद्यालयांचे स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,आनंद ठोळे आदीनी महीला दिना निमित्तानं महीलांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल अमृतकर ,अतुल कोताडे, कुलदीप गोसावी, दिलीप कुडके, निलेश बडजाते आदींनी विशेष परीश्रम घेतले.या प्रसंगी शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.