सोमैया वरिष्ठ व रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सोमैया वरिष्ठ व रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
कोपरगाव विजय कापसे दि २० मार्च २०२४–हास्यविनोद हे मानवी जीवनाचे अनिवार्य अंग आहे. हास्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. हास्याची देणगी निसर्गाने फक्त मानवाला दिलेली आहे. त्यामुळे माणसाने हसले पाहिजे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतानाच सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनातील प्रश्नांपासून काही क्षण दूर नेऊन हसवणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हाही उद्देश असतो.” असे प्रतिपादन प्रख्यात व्यंगचित्रकार आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जवाहर शहा होते.
झळके यांनी या प्रसंगी विनोदी किस्से ऐकवून आणि आपली निवडक व्यंगचित्रे दाखवून विद्यार्थ्यांची दाद मिळवली. संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा आपल्या अध्यक्षीय वक्तव्यात म्हणाले की “सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढेही संस्थेचा आणि महाविद्यालयाचा संस्थेचा असाच नावलौकिक वाढत राहो अशी सदिच्छा देतो.”कार्यक्रमाचे विशेष अतिथी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. सुहास जगताप म्हणाले की “सोमैया महाविद्यालय हे ‘अ’ दर्जाचे महाविद्यालय असून येथील प्राध्यापक उच्चविद्याविभूषित व उत्कृष्ट अध्यापन करणारे प्राध्यापक असल्याने महाविद्यालयाला स्टार कॉलेजचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. आज ज्या गुणवान विद्यार्थ्यांनी बक्षीसांवर आपले नाव कोरले आहे, त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ” विशेष अतिथी मा. पद्मकांत कुदळे म्हणाले की “आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असून त्यांचे नैपुण्य खरोखर मोलाचे आहे. आज ज्या विद्यार्थ्यांना आणि कर्तृत्ववान प्राध्यापकांना येथे गौरविले जाणार आहे. त्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. संस्था व महाविद्यालयाला अशा विद्यार्थी आणि प्राध्यापकांमुळेच नावलौकिक प्राप्त होतो.”
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ठळक घडामोडींचा आढावा घेताना गुणवत्तायुक्त शिक्षण, सामाजिक उत्थान व पर्यावरण रक्षण यासाठी संस्था व महाविद्यालय कटिबद्ध असल्याचेसांगितले.याप्रसंगी महाविद्यालयात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, वाङ्मय व वादविवाद मंडळ इत्यादी विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. त्या नैपुण्याबद्दल १७६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पदवी व पदव्युत्तर स्तरावर प्रत्येक विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सोनू चौधरी, सानिया शेख, ऐश्वर्या दुसाने, गौरी दिवटे, प्रवीण पवार, पूजा अहिरे,गौरी साबळे, रोहिणी मिंड, अनुपमा कोकणे, ऋतुजा जाधव, वैष्णवी भोकरे, विकास शिंदे, कार्तिक शुक्ला, नम्रता जामोडे, सार्थक ठाकरे, समृद्धी आव्हाड या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून समाधान वावळ (एस. वाय. बी. कॉम) व आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्रियंका जोगदंड (टी. वाय. बी. ए.) यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्रीडा प्रकारात महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणाऱ्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनाही स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रो. डॉ. जे. एस. मोरे, प्रो. डॉ. व्ही. सी. ठाणगे, डॉ. आर. ए. जाधव, डॉ. एस. बी. दवंगे, डॉ. नीता शिंदे डॉ. डी. पी. बागुल आदी प्राध्यापकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचाही अतिथींच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे वास्तू रचनाकार राहुल औताडे व माजी विद्यार्थी बगाटे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉ. एन. जी. शिंदे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय व महाविद्यालयात वर्षभर झालेले विविध उपक्रम तसेच महत्वपूर्ण घडामोडींचा अहवाल सादर केला. तसेच श्री. डी. एस बुधवंत यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे, मा. दिनार कुदळे, चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एन. जी. बारे, प्राध्यापक वृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. शैक्षणिक पारितोषिकांचे वाचन डॉ. आर. ए. जाधव यांनी, क्रीडा पारितोषिकांचे वाचन डॉ.एस. बी. कुटे व श्री. कांबळे यांनी, सांस्कृतिक पारितोषिकांचे वाचन डॉ. एस. के. बनसोडे यांनी तर इतर पारितोषिकांचे वाचन डॉ. नीता शिंदे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी आर सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा वर्षा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गणेश देशमुख, व्ही एस. साळुंके, डॉ. एन आर दळवी, प्रो. डॉ.एस. एल. अरगडे, डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.