आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात कॅन्सर अवेअरनेस शिबिर संपन्न
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात कॅन्सर अवेअरनेस शिबिर संपन्न
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात कॅन्सर अवेअरनेस शिबिर संपन्न
येवला विजय कापसे दि २९ मार्च २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून गुरुकुलात इनर व्हील क्लब येवला तर्फे कॅन्सर अवेअरनेस शिबिर संपन्न झाले.
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचे प्राचार्य तुषार कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरास प्रमुख पाहुणे डॉ. संगीता पटेल,जयश्री शाह, डॉ.विजया पाटील, सोनल पटणी, नेहा शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
इनर व्हील क्लब तर्फे कॅन्सर विषयी जनजागृती कार्यांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेण्यात आली होती.त्यासंदर्भात पारितोषिक वितरण देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.त्यात प्रथम क्रमांक पटकावला संस्कृती शिंदे, दुसरा क्रमांक मयुरी मगर, तिसरा क्रमांक शमिका पावटेकर, व उत्तेजनार्थ सृष्टी घोडके.या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.संगीता पटेल यांनी सर्व्हीकल कॅन्सरची माहिती दिली.त्यासंदर्भात सदर लस उपलब्ध होणार आहे व ही लस ९ ते १६ वर्षीय वयोगटातील मुलींना घेता येणार आहे. तसेच पुढील महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेस मोजण्याचे मशीन उपलब्ध होणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचं स्ट्रेस मोजण्यात येणार आहे असे, जयश्री शहा यांनी कळविले आहे,तर याचा सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तर या प्रसंगी प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इनर व्हील क्लबचे आभार व्यक्त केले.