डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे

अश्वमेधच्या अगदी स्वस्तात मिळणार गुणकारी आयुर्वेदिक औषधी गोळ्या- डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे 

अश्वमेधच्या अगदी स्वस्तात मिळणार गुणकारी आयुर्वेदिक औषधी गोळ्या- डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे 
अश्वमेधचे या आदी देखील कोरोना व्हायरस मध्ये काढलेले कफेक्स आणि प्रोटेक्स हे आयुर्वेदिक औषध ठरले होते गुणकारी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ एप्रिल २०२४आयुर्वेद अनेक रोगांना मुळापासून बरा करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे . परंतु त्यात काही औषधे कडू स्वादाची असतात त्यामुळे अनेक रुग्ण गोळ्या खाण्याचा कंटाळा करतात म्हणून त्याच समस्यावर कोपरगाव येथील अश्वमेध प्रकल्पाने स्वादिष्ट चवीला गोड व कमी दरात औषधी गोळ्यांचे उत्पादन सुरू केले असून या गोळ्या अगदी अल्प किंमतीत मिळणार असल्याची माहिती अश्वमेधचे संचालक ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली.             

जाहिरात

वाकचौरे यांनी या विषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, सर्दी खोकल्यासाठी कफेक्स गोळी, १ ते २ मिनिटात ऍसिडिटी घालवणारी  रिफलेक्स गोळी, कब्ज, अपचन त्यामुळे डोकें दुखी व शौचास त्रास होणे या आजारावर व मुळव्याधीस कारणीभूत ठरणाऱ्या वेदनांवर केवळ २ ते ३ दिवसात आणि केवळ २० रुपयाच्या आत आराम देणारी रेक्टीमॅक औषध आदी सर्व बहुगुणी गोळीची प्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने निर्मिती केल्या असून या देशी बनावटीची गोळ्या ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाल्या असून सर्दीतून श्वास महा रोग निमोनिया , दमा , पित्त विकारातून हृदयरोग ,पोटाचे अल्सर , मूळव्याध , मधुमेह , किडनी विकार आदी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी सदरची उत्पादने बहुपयोगी ठरतील असा विश्वास व दावा डॉ वाघचौरे यांना व्यक्त केला आहे.

जाहिरात
सदर प्रकल्पाच्या उभारणीत अहमदनगरचे अन्न  व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक डॉ ज्ञानेश्वर दरंदले यांचा विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाखाली वैद्य डॉ अशोक गावित्रे व वैद्या सायली वाघचौरे यांनी उत्पादने विकासासाठी शास्त्रीय आधार देत त्यांना प्रमाणबद्ध केले आहे.तर उत्पादन प्रकल्प अधिकारी चांगदेव गव्हाणे तर प्रॉडक्ट डिझायनिंग साठी समर्थ वाघचौरे व विक्री आणि विपणनासाठी जयंत शर्मा यांनी विशेष योगदान दिले असल्याचे संचालक  वाघचौरे यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे