शिरसगाव मराठी शाळेत ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
शिरसगाव मराठी शाळेत ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढत गावातील सुपुत्र मेजर अमोल बोऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत देशभक्ती गीतावर कवायत संचालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जाहिरात
गावचे माजी सरपंच सलीम बाबा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत शिरसगाव- सावळगाव ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल अंबादास गायकवाड व मतीन मौलाना तसेच ग्रामस्थ, पालक ,अंगणवाडी सेविका, मदतनीस आशाताई आदींसह महिला पालक उपस्थित होत्या.जाहिरात
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी ,हिंदी, इंग्रजी भाषेत भाषणे व देशभक्तीपर गीत सादर केले. माजी उपसरपंच इरफान पटेल यांनी प्रत्येक देशभक्तीपर गीताला बक्षीस देऊन मदत केली.जाहिरात
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक लांघे सर यांनी केले आभार प्रदर्शन अध्यक्ष राहुल गायकवाड यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शिरसगाव उर्दू शाळा मुख्याध्यापक गफार खान सर ,नबीला मॅडम ,हुमेरा मॅडम ,जयश्री हाडके मॅडम , डाटा ऑपरेटर तृप्ती भवर यांनी विशेष परिश्रम घेतले.