आपला जिल्हा

संवत्सर येथे महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांकडून अभिवादन

संवत्सर येथे महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांकडून अभिवादन
या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य संपत भारुड यांचा सन्मान करण्यात आला
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२४–  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा मागासवर्गीय वाचनालय मंडळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या १९७ जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

जाहिरात
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे संचालक  बापूसाहेब बाराहाते, कर्मवीर काळे साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपराव बोरनारे, पोलीस पाटील लिना आचारी, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड , मधुकर साबळे, किशोर ससाणे, चंद्रकांत ससाणे, राजेंद्र सूर्यवंशी, मोतीराम मैंद, राहुल उगले ,अनिल चंदनशिव, भीमराज मैंद,राजू भामरे तुषार ससाणे, शशिकांत ससाणे, रमेश ससाणे, संतोष खरात, बंडुनाना आचारी,सम्यक भारुड,बाळु भारुड,गणेश तांबे  लक्ष्मण कांबळे ,बाळासाहेब सोनवणे ,जालू पांडव ,विकास आचारी, विजय काकडे ,जाकिरभाई पठाण आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, महेश परजणे ,लक्ष्मण साबळे, लिनाताई आचारी, ॲड. शिरीष लोहकणे आदींनी  आपले मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याची महती सांगितली तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित भारुड यांनी व उपस्थितांचे आभार कुंदाताई भारुड यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे