स्पर्धेत टिकण्याची स्व.कोल्हे साहेब यांची शिकवण सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी – रामभाऊ वक्ते
स्पर्धेत टिकण्याची स्व.कोल्हे साहेब यांची शिकवण सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी – रामभाऊ वक्ते
स्पर्धेत टिकण्याची स्व.कोल्हे साहेब यांची शिकवण सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी – रामभाऊ वक्ते
कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२४– जेऊर कुंभारी येथील रामभाऊ संपतराव वक्ते हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या फिटर (बॉयलींग हाऊस) या पदावरून २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल कामगारांच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर नुकताच संपन्न झाला.

या प्रसंगी सेवानिवृत्त रामभाऊ वक्ते पुढे बोलताना
म्हणाले की, आपण परिस्थितीवर संघर्षाने मात केली. समर्थ सेवा मनुष्याचे प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देत असते. संजीवनी उद्योग समुहात काम करतांना अनेक गोष्टींची शिकवणुक मिळाली ती सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी आहे. स्पर्धेत सहकारी साखर कारखानदारीने काय आत्मसात करावे याची शिकवण माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली ती कायम सोबत राहणार आहे.

याप्रसंगी कारखान्याचे इंजिनीयर चीफ केमिस्ट राजसाहेब, इंजिनीयर शेळके साहेब, डमाळे साहेब, मोरे साहेब, बागडे साहेब, सुनील वक्ते, राजेंद्र वक्ते तसेच विभागातील सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक शशिकांत वक्ते यांनी केले केले तर सुत्रसंचालन नितीन गाडे व आभार गिरीष कुलकर्णी यांनी मानले.





