महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत श्रेया चौरे प्रथम
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत श्रेया चौरे प्रथम
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत श्रेया चौरे प्रथम
कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२४– क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील माळी बोर्डिंग,महात्मा फुले मंडळ व समस्त माळी समाज बांधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत श्रेया सचिन चौरे हिने प्रथम क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे

नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील माळी बोर्डिंग, महात्मा फुले मंडळ व समस्त माळी समाज बांधव यांच्या वतीने विविध उपक्रम राबवत साजरी केली या प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यां साठी अनेक उपक्रम राबविले यात संजीवनी अकॅडमी मध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रेया सचिन चौरे या विद्यार्थिनींनी चित्रकला या स्पर्धेत सहभागी नोंदवत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या शुभहस्ते तिचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. तिच्या या यशाबद्दल संजीवनी अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी तसेच माजी सैनिक कोपरगाव तालुका संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहे.






