आपला जिल्हा

साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगावला यायला वाहनांची सुसज्ज व्यवस्था

साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगावला यायला वाहनांची सुसज्ज व्यवस्था
साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगावला यायला वाहनांची सुसज्ज व्यवस्था
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ एप्रिल २०२४जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी हे साईबाबांचे देवस्थान असून  श्री राम नवमीला शिर्डीमध्ये लाखो भाविक दर्शनाला येत असतात याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साई गाव पालखी द्वारे कोपरगाव तालुक्यातील हजारो भाविक रामनवमीनिमित्त शिर्डीला पायी जात असतात यावेळी संपूर्ण कोपरगाव शिर्डी साई पालखी महामार्ग साई भक्तांनी फुलून गेलेला असतो.

जाहिरात

सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि १७ एप्रिल रोजी असलेल्या रामनवमीनिमित्त मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साईगाव पालखीने हजारो भाविक कोपरगाव वरून श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे जाणार असून या भाविकांना शिर्डी वरून परत कोपरगावला येण्यासाठी मोठया प्रमाणात  वाहनांची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित साईगाव पालखीच्या आयोजकांनी दिली आहे.

जाहिरात
या वाहन व्यवस्थे करिता सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, समता नागरी पतसंस्थेचे काका कोयटे, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कोपरगाव  वाहतूक चालक-मालक संघटनेचे रॉकी फर्नांडिस, कोपरगाव एसटी आगार व्यवस्थापक अमोल बनकर, निरीक्षक अविनाश गायकवाड आदीं सह संपूर्ण साई भक्त कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
रामनवमीच्या दिवशी शिर्डी वरून कोपरगावला परत येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी पोलीस स्टेशन जवळ वाहनांची व्यवस्था रात्री  १० पासून ते पहाटे पर्यंत करण्यात आली आहे.
रामनवमी च्या दिवशी रात्री वाहतूक व्यवस्थेसाठी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था देखील शिर्डी पोलीस स्टेशन आवारात करण्यात आली आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे