प्राध्यापक अमृततुल्यच्या शाखा क्र.२ चे रमेशगिरीजी महाराजांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
कोपरगाव येथील शाखा क्रमांक १ ला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्राहकांच्या सेवेत येसगाव येथे शाखा क्रमांक २

कोपरगाव विजय कापसे दि १५ एप्रिल २०२४– प्रा.वाय.पी.शिंदे संचलित YP’S प्राध्यापक अमृततुल्य या ब्रँडच्या शाखा क्र.२ चा उद्घाटन समारंभ शनिवार दि.१३ एप्रिल रोजी राष्ट्रसंत सद्गूरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टचे मठाधिपती प.पु.गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्स. प्रा.लि.चे चेअरमन पराग संधान, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख , कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी , कला वाणिज्य महाविद्यालय, येवला येथील प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष मनीष जाधव, कार्यध्यक्ष विजय कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

असलेले तसेच पीएच डी सुरू असलेले प्राध्यापक अमृततुल्यचे प्रा.वाय.पी.शिंदे यांनी आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून जूलै २०२२ मध्ये कोपरगाव येथे YP’S प्राध्यापक अमृततुल्य नावाने चहा व्यवसायात एक नविन ब्रँड सुरु केला करत त्यात चांगला जम बसवत आज याचीच शाखा क्र.२ कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील बी.आर्किटेक्, डी.आय.डी, डी.सी.ए. असे उच्च शिक्षित गणेश वाल्मिक मोरे यांना फ्रँचाइझी तत्वावर देण्यात येऊन आज त्याच शाखेचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

या प्रसंगी प्रो.डॉ.जे.एस.मोरे सर, प्रा.विशाल पोटे, एॅड.नितीन पोळ, प्रा.भाऊसाहेब कांबळे, प्रशांत भास्कर , महेश गावंड , अशोक सुर्यवंशी , उमेश बोढरे, पुरुषोत्तम कोल्हे, खिर्डीचे सरपंच चंद्रकांत चांदर, उपसरपंच निलेश वराडे, सदस्य रमेश भास्कर, माजी पो.पा.बाबासाहेब वराडे, माजी सरपंच सोपान चांदर, येसगावचे संदीप गायकवाड, किरण गायकवाड, दगडू दरेकर, आंचलगावचे पो.पा.दादासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, वाल्मिक शिंदे, रामकृष्ण शिंदे, अभिषेक शिंदे, आंचलगाव वि.का.सो.चे चेअरमन साहेबराव गायकवाड, व्हा.चे. सोपान शिंदे, बोलकी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश बोळीज, कृ.ऊ.बा.अध्यक्ष साहेबराव रोहोम, संचालक विश्वासराव महाले, बोलकी सोसा.चे बाबासाहेब महाले, चंद्रभान रोहोम, शिवाजीराव दवंगे आदी मान्यवरांन उपस्थित होते.

तसेच भरोसा सेल अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव ,प्रसिद्ध नाईक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा प्रसाद नाईक, संदीपजी देवकर, दिनेशजी कोल्हे, विवेक खांडेकर, बापूसाहेब सुराळकर यांनी देखील शुभेच्छा संदेश देत प्राध्यापक अमृततुल्य यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.वाय.पी.शिंदे यांचे वडील प्रकाश शिंदे, गणेश मोरे यांचे वडील वाल्मिक मोरे, सुमित दरेकर, सुनिल दाभाडे, महेश मुंदडा, संदीप रोहोम, राहूल आहेर आदींनी अथक परिश्रम घेतले.





