शिर्डी ते कोपरगाव जड वाहतूक अन्य मार्गे वाळवावी- ऍड. नितीन पोळ
शिर्डी ते कोपरगाव जड वाहतूक अन्य मार्गे वाळवावी- ऍड. नितीन पोळ
रामनवमी निमित्ताने शिर्डी येथे साई मंदिरात भव्य दिव्य सोहळा साजरा होत असतो कोपरगाव वरून अनेक भाविक मोठ्या संख्येने शिर्डी येथे पायी जातात
कोपरगाव विजय कापसे दि १६ एप्रिल २०२४– रामनवमी निमित्ताने शिर्डी येथे साई मंदिरात भव्य दिव्य सोहळा साजरा होत असतो कोपरगाव वरून अनेक भाविक मोठ्या संख्येने शिर्डी येथे पायी जातात त्यामुळे राम नवमी निमित्ताने कोपरगाव ते शिर्डी महामार्गवरील जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ऍड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, राम नवमी निमित्ताने शिर्डी येथील साई बाबा मंदिरात भव्य दिव्य सोहळा साजरा होत असतो. कोपरगाव येथील मुंबादेवी देवी मंडळाच्या वतीने कोपरगाव येथे अनेक वर्षा पासून या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो व त्याची सांगता साई पालखी शिर्डी येथे नेऊन केली जाते या साई पालखी मध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील लाखो भाविक सहभागी होतात मात्र सद्या कोपरगाव ते सावळी विहीर या रस्त्याच्या नवीन दुरुस्ती चे काम सुरु आहे त्या मुळे मोठी वाहतूक कोंडी होते त्याच प्रमाणे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदलेला आहे त्याच प्रमाणे अनेक मोठी यंत्र रस्त्यावर आहेत या रस्त्यावरून पायी पालखी जाणार असल्याने व मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने व अनेक ठिकाणी भाविकांना नास्ता चहा सरबत आदी व्यवस्था केली जाते त्यामुळे या रस्त्याची वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहतूक अन्य मार्गांवरून वळवण्यात यावी अशी मागणी ऍड. नितीन पोळ यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.