आपला जिल्हासंगमनेर

काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी पावसे कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले

काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी पावसे कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले
काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी पावसे कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि १९ एप्रिल २०२४हिवरगाव पावसा येथील पावसे परिवारातील दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबियांची भेट घेऊन काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले आहे.

जाहिरात
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दिनांक 17/4/202 रोजी चार वाजता खेळण्यासाठी गेलेले दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रितेश सारंगधर पावसे वय 12 वर्षाचा असून तो पाचवी शिकत होता तर प्रणव सारंगधर पावसे वय 8 वर्षाचा हा प्राथमिक विद्यालयात इ. 3री शिकत होता. वर्षापूर्वीच या घरातील वडिलांचे छत्र हरपल्याने आईने कष्टाने शेती करून मुलांचा संभाळ करून उदरनिर्वाह करत होत्या. परंतु शाळेला सुट्टी असल्याकारणाने खेळण्यासाठी गेलेल्या दोन भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याने पावसे कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला.

जाहिरात

यावेळी आ.थोरात म्हणाले की पावसे कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असून शासकीय स्तरावर जी मदत असेल ते मिळून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच गावातील गावकऱ्यांनी पावसे कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहून आधार देण्याचे काम करावे असे ते म्हणाले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे