आपला जिल्हा

एक राखी जवानासाठी  उपक्रमांतर्गत रक्षा रथाचे येसगावच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भव्य स्वागत

एक राखी जवानासाठी  उपक्रमांतर्गत रक्षा रथाचे येसगावच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भव्य स्वागत

एक राखी जवानासाठी  उपक्रमांतर्गत रक्षा रथाचे येसगावच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भव्य स्वागत

जाहिरात

 कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२५
संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने २०१९ पासून राबवण्यात येणारा “एक राखी जवानासाठी” हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. या उपक्रमात देशभरातील विविध शाळांमधून विद्यार्थी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या संकलित करून भारतीय सीमांवर कार्यरत जवानांपर्यंत पोहोचवतात. याच उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यार्थिनींनी मनोभावे तयार केलेल्या राख्या संकलित करण्यात आल्या.

जाहिरात

या राख्यांसोबत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रके, प्रेमाचे संदेश, आणि देशप्रेम जागवणाऱ्या ओळीही लिहिल्या. विद्यार्थ्यांना ऑपरेशन सिंदूर या अभियानाची माहितीही देण्यात आली. यानंतर सोमवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी शिर्डी ते श्रीनगर दरम्यान प्रवास करणारा “रक्षा रथ” विद्यालयात दाखल झाला.

जाहिरात

या रथाचे भव्य स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या उधळणीत, विद्यार्थ्यांच्या घोषणांत आणि टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले.
कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक  रंगनाथ ठाकरे, स्थानिक स्कूल कमिटी निमंत्रित सदस्य  किरण गायकवाड, सल्लागार समिती सदस्य  अतुल सुराळकर, पर्यवेक्षिका  जयश्रीताई आंबरे ,शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  विवेकभैया कोल्हे यांच्यासह सर्व युवासेवकांना शुभेच्छा व अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे समन्वयक  रामदास गायकवाड, दीपक खालकर, शिवाजी भुतांबरे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवण्याचे मोलाचे कार्य केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव परिवाराचे विशेष कौतुक होत आहे. राखीचा एक धागा – जवानासाठी अभिमानाचा भाग! हे ब्रीद साकारत या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनामनात देशसेवेचे स्फुलिंग प्रज्वलित केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे