आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यातून वाकचौरे यांना मोठे मताधिक्य मिळेल- युवासेना तालुकाप्रमुख गोर्डे

कोपरगाव तालुक्यातून वाकचौरे यांना मोठे मताधिक्य मिळेल- युवासेना तालुकाप्रमुख गोर्डे

कोपरगाव तालुक्यातून वाकचौरे यांना मोठे मताधिक्य मिळेल- युवासेना तालुकाप्रमुख गोर्डे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ एप्रिल २०२४–  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी करणारे भाऊसाहेब वाकचौरे यांना वेस सोयगाव रांजणगाव सह संपूर्ण कोपरगाव तालुक्यातुन मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे यांनी व्यक्त केला.

जाहिरात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब  वाकचौरे यांच्या प्रचारास जोरदार सुरुवात झाली असून नुकतीच कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस सोयगाव व रांजणगाव मध्ये शनिवार दि २० एप्रिल रोजी छोटेखाने प्रचार सभा संपन्न होऊन यात परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिकांच्या तसेच ठाकरे गटाचे उमेदवार वाकचौरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

जाहिरात
याप्रसंगी गोर्डेयांनी पुढे बोलताना सांगितले की, भाऊसाहेब वाकचौरे यांनी युतीचे खासदार असताना निरवडे धरणासाठी अनेक प्रयत्न करत केंद्र सरकारकडून १४ तर कोर्टातून ३ मान्यता मिळवत निळवंडे कृती समितीला देखील पाठिंबा दर्शवेत निळवंडे धरणासाठी मनापासून प्रयत्न केल्याचे गोर्डे यांनी सांगितले तर याप्रसंगी अनेक वक्तांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा वाकचौरे मोठ्या मताधिक्याने दिल्लीला जातील असा विश्वास व्यक्त केला व अनेकांनी वाकचौरे यांना निवडणुकीसाठी आर्थिक मदतीची झोळी फिरवत आर्थिक मदत केली

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे