विवेक कोल्हे

शिंगणापूर व संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाजाच्या वतीने गरजू मुलांना शालेय साहित्य व सायकलीचे वाटप

शिंगणापूर व संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाजाच्या वतीने गरजू मुलांना शालेय साहित्य व सायकलीचे वाटप
महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज : विवेक कोल्हे 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ एप्रिल २०२४राष्ट्राला विकसीत करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या बलिदान हे डोक्यावर घेण्यासारखे आहे, मात्र ते डोक्यावर घेऊन डोक्यात घेऊन त्यांच्या विचारातुन कृती आणणे आवश्यक आहे, त्यामुळे विचारापूरते मर्यादित न राहता त्यांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

जाहिरात

                 शिंगणापूर आणि संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाजाच्या वतीने आयोजित कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ (दि.२३) मंगळवार रोजी जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सकल आंबडेकर समाजाच्या वतीने अतिरिक्त खर्चाला फाटा देत गरजू मुलांना शालेय साहित्य व सायकलीचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये सायकल, शालेय साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना झोपण्याचे बेडचे वाटप  विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

जाहिरात
            पुढे कोल्हे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’. असा बहुमोल विचार दिला होता, त्या भावनेतून या समाज्याच्या लोकांनी शिक्षणात मदत उभी केली आहे, याचे कौतुक वाटते, हाच भाव लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या आणखी १० सायकल देण्याचे जाहीर केले.
            या प्रसंगी सरपंच डॉ.विजय काळे सकल आंबेडकर समाजाचे अध्यक्ष विजय जाधव,  उपाध्यक्ष अमोल वाघ, अतिश त्रिभुवन, संकेत मगर, अमोल जाधव, आकाश डोके, रोहित वाघ, सचिन पगारे, विशाल दाभाडे, विश्वास मोरे, सागर पवार,   साईनाथ जाधव,  राहुल लखन, प्रशांत आढाव, दत्तू नाना सवंत्सरकर, विलास सवंत्सरकर, यादवराव सवंत्सरकर, भिमा सवत्सरकर, बाळासाहेब सवंत्सरकर, शाम सवंत्सरकर, अशोक वराट,  गणेश राऊत,  सागर शिंदे, राजेंद्र काळे, तुषार साळवे, जितेंद्र रणशुर, दीपक गायकवाड, विजय त्रिभुवन, सचीन दाभाडे, राजश्रीताई काळे, सखुबाई काळे, बिजलाबाई काळे, सिंधुबाई काळे, डॉ. वर्षा  झवर आदीसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे