करंजी बु

शिष्यवृत्ती परीक्षेत करंजीच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

शिष्यवृत्ती परीक्षेत करंजीच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
शिष्यवृत्ती परीक्षेत करंजीच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ मे २०२४महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती   इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल  मंगळवार दि ३० एप्रिल रोजी जाहीर झाला असून यात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय करंजी बुद्रुक या विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जाहिरात
    या शिष्यवृत्ती परीक्षेत कर्मवीर शंकरावजी काळे माध्यमिक विद्यालय करंजी बुद्रुक या शाळेतील

इयत्ता पाचवीचे २९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात प्रेरणा निलेश कापसे या विद्यार्थिनीने २९४ पैकी २३० गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला तर तुलसी मच्छिंद्र भिंगारे २२८ गुण, सिद्धी राहुल संवत्सरकर २२० गुण व  वेदिका दादासाहेब कूहीले २१४ गुण मिळविले आहे तर उत्तीर्ण २४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी १८० पेक्षा जास्त गुण मिळवत नावलौकिक मिळविला आहे तर इयत्ता आठवीचे अरमान अन्वर पठाण ,आयुष योगेश आगवन व निकिता रामदास आगवन हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  शालेय शिक्षक ललित जगताप, सुनील पिंपळे, सिद्धार्थ बरडे ,सचिन डांगे देविदास झाल्टे यांनी व विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .

जाहिरात

  या   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष  आमदार आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष कारभारी आगवन, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य  सांडू पठाण, डॉ.सुनील देसाई, विद्यालयातील उपशिक्षक गजानन सांगळे, संदीप चव्हाण , राधाकिसन टाकसाळ,  अनिल सरोदे, गवनाथ डोखे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह सह समस्त करंजी पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी
    

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे