जनता दरबारातील प्रश्न मार्गी: प्रभाग क्रमांक २ येवला रोडवरील नरोडे चाळेतील भूमिगत गटाराचे काम सुरू
जनता दरबारातील प्रश्न मार्गी: प्रभाग क्रमांक २ येवला रोडवरील नरोडे चाळीतील भूमिगत गटाराचे काम सुरू
जनता दरबारातील प्रश्न मार्गी: प्रभाग क्रमांक २ येवला रोडवरील नरोडे चाळीतील भूमिगत गटाराचे काम सुरू

कोपरगाव विजय कापसे दि १७ जुलै २०२५– येवला रोडवरील नरोडे चाळ भागातील भूमिगत गटार योजना अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. स्थानिक नागरिकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाची दखल अखेर घेतली गेली असून, संबंधित काम आजपासून प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

येथील नागरिकांनी आपला प्रश्न जनता दरबारात मांडत आमदार आशुतोष दादा काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत कोपरगाव नगर परिषदेला तत्काळ कार्यवाहीसाठी सुचना दिल्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे पाठपुरावा केल्यामुळे आज अखेर या भूमिगत गटाराच्या कामाला सुरुवात झाली आहे.

स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, “खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आज मार्गी लागला. आमदार दादांचे आणि नगर परिषदेचे आभार मानतो,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

या कामाच्या पूर्णत्वानंतर परिसरातील आरोग्य व स्वच्छतेसंबंधी समस्या दूर होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अनिरुध्द काळे






