गोदावरी स्वच्छतेचा ध्यास घेणाऱ्या आदिनाथ ढाकणे यांचा राष्ट्रीय सन्मान अभिमानास्पद-खासदार वाकचौरे
गोदावरी स्वच्छतेचा ध्यास घेणाऱ्या आदिनाथ ढाकणे यांचा राष्ट्रीय सन्मान अभिमानास्पद-खासदार वाकचौरे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २९ ऑक्टोबर २०२६: कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे कार्य करणारे स्वच्छतादूत व पर्यावरणप्रेमी आदिनाथ गोरखनाथ ढाकणे यांना नवी दिल्ली येथे शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री मा. ना. राजभूषण चौधरी, जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह आणि डॉ. अनिल सिंह यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय जलप्रहरी २०२६’ पुरस्कार मिळाल्याबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नवी दिल्ली येथील त्यांचा शासकीय निवासस्थानी सत्कार केला व त्यांचे कौतुक करून अभिनंदन करत या पुरस्कारामुळे कोपरगावच्या गोदावरी स्वच्छता चळवळीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असल्याचे सांगितले.
जाहिरात
आदिनाथ ढाकणे हे गेल्या ३९१ आठवड्यांपासून गोदावरी नदी स्वच्छतेचे सातत्यपूर्ण कार्य करीत आहेत. नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक व इतर अस्वच्छता दूर करण्याबरोबरच नदीचे पावित्र्य जपणे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अनेक वर्षे सुरू ठेवलेली त्यांची ही सेवा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नमूद केले.जाहिरात
“आदिनाथ ढाकणे यांच्या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ गोदावरी स्वच्छता कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही कोपरगावसह संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे. नदी, जलस्रोत आणि पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. आदिनाथजींच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाची पोचपावती आहे,” अशा शब्दांत खासदार वाकचौरे यांनी आदिनाथ ढाकणे यांचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे आणि बंटी जाधव उपस्थित होते.