रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे घवघवीत यश
रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे घवघवीत यश
रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे घवघवीत यश
अहमदनगर प्रतिनिधी दि १ मे २०२४– रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या *रयत ऑलिंपियाड परीक्षेत अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अश्लेषा विवेक गहाणडुले व अद्वेत विवेक गहाणडूले या दोन विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत यश संपादन करून पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुल कुंभोज ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथील शोध प्रकल्प मार्गदर्शक शिबीरासाठी निवड झाली आहे.
या दोनही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विज्ञान
विषयक शोध प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, स्कुल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर ,विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, प्राचार्या छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदी सर्व सेवकवृंद यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.