आपला जिल्हावंचित आघाडी

उत्कर्षा रूपवते सर्वगुण संपन्न शिर्डी लोकसभेच्या प्रथम महिला उमेदवार- जिल्हाध्यक्ष कोळगे

उत्कर्षा रूपवते सर्वगुण संपन्न शिर्डी लोकसभेच्या प्रथम महिला उमेदवार- जिल्हाध्यक्ष कोळगे

सर्व भारतभर लोकसभा निवडणुकीने जोर धरला असून ऐन कडाक्याच्या उन्हात  मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपाणे वातावरण आणखीनच गरम झाले असताना यात राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील मागे नसून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात खरा सामना होताना दिसून येत असताना अचानकपणे काँग्रेस मधून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून उमेदवारी मिळवत उत्कर्षा रूपवते यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची लढाई दुरंगी म्हणता-म्हणता आता तिरंगी होऊ घातली असून संपूर्ण मतदारसंघ राजकीय घडामोडींनी ढवळून निघाला आहे.
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२४शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्या उत्कर्षा प्रेमानंद रुपवते या सुसंस्कृत उच्चशिक्षित व सर्वगुण संपन्न अशा महिला उमेदवार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवायचे असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वंचितचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे, उपजिल्हाध्यक्ष अमजदभाई शेख, शहराध्यक्ष शुभम शिंदे, तालुका सचिव गोऱ्यादादा चोपदार, दत्तू घोडेराव, आव्हेज मणियार,राजेंद्र पगारे, फिरोज पठाण, तन्वीर शेख, हर्षद शेख, आरिफ पटेल, अक्षय पवार, अजिज शेख आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी पुढे बोलताना सांगितले की, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे विकासाचे व्यापक व्हिजन असून ते सर्वधर्मीयांना बरोबरीने सोबत घेऊन चालणारे राज्यातील एकमेव नेतृत्व असून राज्यातील बहुतांश वंचित चे उमेदवार हे सर्व जाती धर्माचे असून उमेदवारी जाहीर करतांना उमेदवाराची जात जाहीर करणारा वंचित हा एकमेव सर्वाना समान संधी देणारा राजकिय पक्ष असून त्यातीलच एक व्यापक विकासाचे व्हिजन असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या शिलेदार उत्कर्षा प्रेमानंद रूपवते या आहेत.

आयोजित पत्रकार परिषद

कोळगे यांनी पुढे सांगितले की, संबंध राज्यभर चर्चेला जात असणारा मराठा आरक्षण प्रश्न समाजातील गरीब मराठ्यांना  शैक्षणिक व नोकरीसाठी आरक्षणाची नितांत गरज असल्याचे सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ओळखून मराठा आरक्षण साठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवीत वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्याचे देखील काम केले होते तर चार वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेल्या उपोषणास देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता त्यामुळे वंचित आघाडी ही नेहमीच गरीब गरजू मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता सर्वाना ही शेवटची संधी असे समजून मातब्बर राजकीय घराण्यांचा हा सत्तापिपासू पणाचा खेळ थांबवण्यासाठी आपण सर्वसामान्य मतदारांनी एकत्र येत एकजुटीने राज्यघटनेने दिलेला हा मतदानाचा हक्क दान न करता तो आपला अधिकार आहे असे समजून त्याचा हक्क बजावत आपल्याला भौतिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली कटिबद्ध असलेल्या  उमेदवारांसाठी आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावत वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सर्वगुणसंपन्न उमेदवार उत्कर्षा  रूपवते यांना बहुमताने  दिल्लीला खासदार करून पाठवण्याचे आवाहन याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी केले.

जाहिरात
तर उत्कर्षा रूपवते या एक राजकारणी आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी राहिलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री दादासाहेब रूपवते यांची नात असून आज त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदार झाल्यानंतर संपूर्ण विकास करण्याचा जो विडा उचलला आहे तो नक्कीच अभिमानास्पद  असून प्रथमच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रूपवते यांच्या रूपाने एक महिला खासदार म्हणून दिल्लीला पाठविण्यासाठी आपण सर्व एकत्र येत काम करत मतदार संघात रुपवते यांच्या रूपाने एक महिला खासदार निवडून देत इतिहास घडविणार असल्याची भावना उपस्थित वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 
वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते  यांच्या प्रचारार्थ संविधान निर्धार महासभा ॲड.  प्रकाश आंबेडकर यांच्या तसेच सर्व वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवार दि ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली असून बहुसंख्येने सर्व धर्मीय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कोळगे यांनी केले आहे.
 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे