काँग्रेस

आघाडीचा व काँग्रेसचा ज्यांनी धर्म पाळाला नाही त्यांच्यावर कारवाई होणार – नितीन शिंदे 

आघाडीचा व काँग्रेसचा ज्यांनी धर्म पाळाला नाही त्यांच्यावर कारवाई होणार – नितीन शिंदे 
शिर्डी मतदारसंघात आघाडी चे वर्चस्व – नितीन शिंदे 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ मे २०२४शिर्डी मतदारसंघात निवडणुकीत आघाडी चे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रचाराच्या निमित्ताने घराघरात पोहोचले असुन त्यांना मतदारसंघात चांगला प्रकाराचा प्रतिसाद मिळाल्याने मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आत्मविश्वास काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जाहिरात

आघाडी चे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यापूर्वी केलेले कामकाज आजही जनतेच्या डोळ्यांपुढे आहे. सध्याची लोकसभेची निवडणूक ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असुन यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य देऊन दिल्ली ला पाठविणे गरजेचे आहे. युवा पिढीला नोकरीचे आमिषाने देऊन युवकांना जवळ धरणे हा मोदी सरकारचा डाव आहे हे युवकांच्या लक्षात आले आहे एवढेच नसुन शेतकरी, सर्वसामान्य, गोरगरीब, महिला यांना देखील या सरकारने फसविले आहे याचा रोष किती हे जनता त्यांच्या मतदानातून दाखवून देणार यावेळी देशात इंडिया आघाडीचे व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार यात मतदारांच्या मनात शंका राहिलेली नाही असुन आघाडी चे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहणार आहे. तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी तसेच सदस्य यांनी आघाडी तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठांचे आदेशा चे उल्लंघन केले असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहे.

जाहिरात

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणूकीचा धुरळा उडत असुन दिनांक ११/५ संध्याकाळ पर्यंत प्रचार करण्यासाठी अधिकृत शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघाचा इतिहास बघता साल २००९ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु आरपीआयचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांना ही जागा काँग्रेस आघाडीतर्फे देण्यात आली व हा मतदारसंघ शिवसेनेचा झाला. सध्याची परिस्थिती बघता शिवसेना ही जागा कायम स्वतःकडेच ठेवणार कारण कोणीही उमेदवार निवडून आला तर ही जागा शिवसेनेचीच असणार असंच चित्र आज दिसत आहे. कोपरगाव तालुक्यात महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संदीप वर्पे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,कोपरगांव काॅग्रेस शहराध्यक्ष तुषार पोटे शिवसेना पदाधिकारी व्यतिरिक्त प्रचारात भाग घेताना दिसत आहेत. हा मतदारसंघ कायमचा शिवसेनेकडे गेल्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस मधील काही इच्छुक व्यक्ती या नाराज झाल्या आणि पक्षा बाहेर गेल्या.  राजेंद्र वाघमारे व उत्कर्षा रूपवते हे आज काँग्रेसचे पूर्वश्रमीचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी करत आहेत, त्यामुळे काही कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी तसेच सदस्य यांनी आघाडी तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठांचे आदेशा चे उल्लंघन केले असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहे या बाबत सखोल चौकशी होवुन ज्यांनी आघाडी व काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांच्यावर निश्चितच कारवाई करणार असल्याचे दणका देखील काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी दिला आहे.

नितीन शिंदे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे