आपला जिल्हा

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा कौस्तुभ तोरकड तृतीय

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा कौस्तुभ तोरकड तृतीय
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा कौस्तुभ तोरकड तृतीय
जाहिरात

अहमदनगर प्रतिनिधी दि ६ जुन २०२४ट्रॅक नाईट राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा नुकतीच नाशिक येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाली या स्पर्धेत अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील कौस्तुभ अनिल तोरकड या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जाहिरात

 सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असता यात अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील कौस्तुभ अनिल तोरकड या विद्यार्थ्यांने ३०० मीटर व ७० मीटर धावणे या धावण्याच्या स्पर्धेत  तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ पदक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

जाहिरात
 शाळेचा विद्यार्थी कौस्तुभ अनिल तोरकड याच्या

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, स्कुल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर ,विभागीय अधिकारी  नवनाथ बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी विद्यालयाच्या प्राचार्या छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शिक्षण प्रेमी नागरिक आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे