कोपरगाव नगरपालिका
कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात पर्यावरण दिन साजरा
कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात पर्यावरण दिन साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ६ जुन २०२४– स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद झाली. या दिवसाचे औचित्य साधून १९७३ मध्ये जगाने आपला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी हा विशेष दिवस साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने आज बुधवार दि ५ जुन रोजी कोपरगाव नगर परिषद संचलित भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.