कोपरगाव नगरपालिका

लोकसहभागातून वृक्षारोपण-पर्यावरण संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद- मुख्याधिकारी सुहास जगताप

लोकसहभागातून वृक्षारोपण-पर्यावरण संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद- मुख्याधिकारी सुहास जगताप
लोकसहभागातून वृक्षारोपण-पर्यावरण संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद- मुख्याधिकारी सुहास जगताप
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ जून २०२४वाढते तापमान रोखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्वाचा आहे. पर्यावरण प्रेमी परिसरातील नागरिक समुहाने एकत्र येत श्रमदान आणि स्व-खर्चाने वृक्षारोपण पालकत्व कार्य कौतुकास्पद असून अशी प्रेरणा नागरिकांनी घेऊन वृक्षारोपण कार्यात व्यापक सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी  साईप्रभानगर येथील रहिवासी यांनी मोकळ्या जागेत संभव्य महादेव मंदिर परिसरात फुलझाडे लावण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करून पालकत्व दिले या प्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात

या प्रसंगी सुशांत घोडके,संतोष वाकचौरे, बापुनाना जाधव, साहेबराव शेजवळ, प्रवीण वाघ, सुनील दळवी, रोहित देशमुख, प्रवीण मुंगसे, सागर मुंगसे, मनोज भांगरे, श्रीकांत माळी, मनोज बारे, रामदास उंबरकर, पुंडलिक लोखंडे, सचिन वाघ, सुमन जाधव, मीरा वाकचौरे, जयश्री मुनसे, वैशाली वाघ, मिनल भांगरे, अनिता माळी, अश्विनी दहे, मयुरी दळवी, कविता बारे, दीपाली मुंगसे, सुनीता देशमुख, उर्मिला उंबरकर यांचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून स्वच्छता – जलशक्ती – वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सोबत अनेक ठिकाणी वृक्षारोपण आणि पालकत्वाचे अभियान लोकसहभागातून विविध ठिकाणी यशस्वी केले असून देशी झाडांचे वृक्षारोपणातून पर्यावरण समतोल पूर्ववत आणून पक्षी-वन्यजीव यासह सजीवांचा नैसर्गिक परिसर सर्वांनी टिकवावा असे वनश्री पुरस्कार प्राप्त सुशांत घोडके यांनी सांगितले.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे