आपला जिल्हाकोपरगाव नगरपालिका

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा उद्या होणारा लोकार्पण सोहळा स्थगित

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा उद्या होणारा लोकार्पण सोहळा स्थगित
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा उद्या होणारा लोकार्पण सोहळा स्थगित
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात उद्या सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू  सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होता परंतु हा सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

या पत्रकात मुख्याधिकारी जगताप यांनी म्हटलें आहे की,  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू  सचिनभाऊ साठे यांच्यासोबत दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनुसार सदरील लोकार्पण सोहळा स्थगित करण्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद अशी माहिती जगताप यांनी दिली आहे.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे