कोपरगाव नगरपालिका
कोपरगाव नागरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
कोपरगाव नागरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
कर्मचाऱ्याचा उस्फुर्त सहभाग
कोपरगाव विजय कापसे दि १३जुलै २०२४– महाराष्ट्र राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) यांचेकडील निर्देशानुसार दि १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणेबाबत कळविण्यात आलेले आहे त्याअनुषंगाने कोपरगाव नगरपरिषदेकडून शुक्रवार दि १२ जुलै रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार कोपरगाव नगर परिषद संचलित भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोपरगाव येथे आरोग्य विभागाकडील कर्मचा-याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास कर्मचा-यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ गायत्री कांडेकर, लॅब टेक्निशियन रजनीगंधा मुसमाडे, फार्मासिस्ट बुशरा मणियार,आरोग्य सेविका रोहिणी नाईक, स्वाती बनसोडे, संगणक अभियंता भालचंद्र उबंर्जे, डीईओ भुषण वडांगळे आदी कोपरगाव नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.