शासकीय आयटीआय कॉलेजमधील ड्रेस मेकिंग अभ्यासक्रमास प्रवेश सुरू- प्राचार्य जाधव
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव मध्ये इलेक्ट्रिशन (विजतंत्री) दोन वर्ष दहावी पास, वायरमन (तारतंत्री) दोन वर्ष दहावी पास नापास, फिटर (जोडारी) दोन वर्षे दहावी पास, टर्नर (कातारी) दोन वर्ष दहावी पास, वेल्डर (संधाता) एक वर्ष दहावी पास नापास, प्लंबर (नळ कारागीर) एक वर्ष दहावी पास नापास व ड्रेस मेकिंग (टेलर) एक वर्ष दहावी पास नापास हे अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी http//admission.dvet.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावे
कोपरगाव विजय कापसे दि २१ जुन २०२४–महाराष्ट्र शासनमान्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव मध्ये दहावी पास मुले, मुली व महिलांसाठी एका वर्षात नोकरी मिळवून देणारा अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास पात्र असा ड्रेस मेकिंग (फॅशन डिझायनिंग) या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू झाले असल्याची माहिती प्राचार्य एस.के.जाधव यांनी दिली आहे.
या शासकीय औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्रेस मेकिंग विभागाच्या प्रमुख नंदिनी गायकवाड यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, हा कोर्स उत्तीर्ण मुले मुली महिलांना शासकीय, निमशासकीय, अशासकीय आस्थापनेवर १००% नोकरीची संधी उपलब्ध आहे तसेच स्वतःचा टेलरिंग, फॅशन डिझाईन, शिवण यंत्रे विक्री व दुरुस्ती, विविध प्रकारचे कापड दुकान सुरू करणे, शिवणकामासाठी लागणारे साहित्य जसे की धागे, पिको फॉल साहित्य आदी कापड साहित्यांचे दुकान, पिको फॉलचे शॉप, साडी किंवा ड्रेसवर भरत काम करणे आदि महत्त्वाच्या कलाकुसर अवगत करून स्वतःचा स्वयंरोजगार व्यवसाय सुरू करता येऊ शकतो त्यामुळे शंभर टक्के स्वयंरोजगाराची हमी देणारा ड्रेस मेकिंग (फॅशन डिझाईन) या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमास जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्रेस मेकिंग या अभ्यासक्रमाच्या प्रमुख नंदिनी गायकवाड यांनी केले आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची अंतिम तारीख ३० जून २०२४ असून महाराष्ट्र शासनाच्या http// admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत फॉर्म भरून कोपरगाव शासकीय आयटीआय कॉलेज मधील प्रवेश कमिटी सदस्यांसोबत संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य एस.के.जाधव यांनी केले आहे.तर प्रवेशासाठी संपर्क गायकवाड एन. व्ही यांना ९६०४०२४१४७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.