आपला जिल्हा
कोपरगाव आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
कोपरगाव आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
बुधवार दि ३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत भव्य शिकावू उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि २८ जुन २०२४– डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्यामार्फत देशभरात राष्ट्रीय अप्रेंटीसशिप मिळाव्याचे आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देखील बुधवार दि ३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत भव्य शिकावू उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा मूलभूत प्रशिक्षण अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.के.जाधव आणि अहमदनगरचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.व्ही.जाधव यांनी दिली आहे.
याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या वेगवेगळ्या आयटीआय कोर्सेस उत्तीर्ण, एमसीव्हीसी (इयत्ता बारावी) अभ्यासक्रम उत्तीर्ण, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मान्य वेगवेगळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण अथवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिकवू उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप मिळावी याकरिता भव्य शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तरी इच्छुक पात्र जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक, आयटीआय, एमसीव्हीसी अथवा कौशल्य व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे मार्कशीट व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड आदी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रति घेऊन बुधवार दिनांक ३ जुलै कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय आयटीआय कॉलेज कोपरगाव यांनी केले आहे अधिक माहितीसाठी ०२४२३ २२२४२६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.