माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

अमरधाम मध्ये अंत्यविधी झाल्यानंतर मृत्यू नोंद बाबत केलेल्या बदलाची जागृती करावी- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

 अमरधाम मध्ये अंत्यविधी झाल्यानंतर मृत्यू नोंद बाबत केलेल्या बदलाची जागृती करावी- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

अमरधाम मध्ये अंत्यविधी झाल्यानंतर मृत्यू नोंद बाबत केलेल्या बदलाची जागृती करावी- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव विजय कापसे दि १८ जुलै २०२४ कोपरगाव शहरामध्ये अंत्यविधी होत असलेल्या अमरधाम , कब्रस्तान , ख्रिश्चन स्मशानभूमी या ठिकाणी मृत्यू नोंद बाबतचे , डेथ सर्टिफिकेट मिळणे करिता माहितीपत्र फ्लेक्स बोर्ड तात्काळ लावावे  नगरपालिका स्थापनेपासून अनेक वर्षांपासून अंत्यविधी झाल्यानंतर अमरधाम येथे नगरपालिकेने नोंद रजिस्टर वही ठेवली होती .त्यात अंत्यविधी झाल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव , वय , पत्ता व नोंदवणाऱ्या ची माहिती याची नोंद मृत झालेल्या व्यक्तीच्या घरातील नागरिक करत होता व ही नोंद नगरपालिका रोजच्या रोज पालिकेच्या दप्तरी घेत होती. अलीकडच्या वर्षात अमरधाम मधील स्मशान जोगी एक पावती द्यायचा, त्यानुसार नगरपालिकेमध्ये नागरिक नंतर जाऊन नोंद करायचे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासूनही नगरपालिकेने १ जुलैपासून अचानकपणे ही जुनी पद्धत बंद केल्याने नागरिकांमध्ये घरची व्यक्ती मृत्यू झाली असताना , दुःखात असताना नोंदी बाबतची संभ्रमता निर्माण झाली. याबाबतचे मोठे फ्लेक्स शहरातील प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या असणाऱ्या अंत्यविधीच्या ठिकाणी नगरपालिकेने लावणेगरजेचे होते व नवीन नवीन नागरिकांमध्ये कळेपर्यंत एक पूर्ण वेळ माणूस ठेवून त्याचाही मोबाईलनंबर नागरिकांपर्यंत या ठिकाणी माहिती देण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते.

जाहिरात

निश्चितपणे शासनाच्या नियमाप्रमाणे काही बदल नगरपालिका करत असेल तर त्याचे स्वागत आहे व ती केलेच पाहिजे. परंतु अचानक पणे असे करणे त्या दुःखीत कुटुंबावर संभ्रमावस्था निर्माण होते त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या बद्दलाची जनजागृती करावी अशी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात

या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की,  अंत्यविधी करण्याच्या वेळेस नगरपालिकेच्या माणसाला कळवले पाहिजे व २१ दिवसाच्या आत मृत व्यक्तीची नोंद ही केली गेली पाहिजे. तसेच पन्नास वयाच्या आतील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासकीय रुग्णालयातून मृत्यूचे कारण पोस्टमार्टम करून अंत्यविधीच्या आधी त्याबाबतचा दाखला घेणे गरजेचे आहे. तसेच नैसर्गिक रित्यामृत झालेल्या वयोवृद्ध किंवा व्यक्तीचा कशामुळे झाला याचे मृत्युपत्र हे संबंधित फॅमिली डॉक्टरांकडून आधी घेतले पाहिजे.
तरी नगरपालिकेने याबाबत नागरिकांमध्ये माहिती पोहोचून , रिक्षाने अनाउन्समेंट करून , तात्काळ फ्लेक्स बोर्ड लावून मृत्यू दाखला सोयीस्करित्या हेल्पटे चक्रा न मारता नागरिकांना कसा मिळेल व त्या दुखीत कुटुंबाला कसे सहजरित्या दाखला देऊन सांत्वन रुपी सहकार्य नगरपालिकेकडून व्हावे हीच अपेक्षा.

जाहिरात

तसेच नगरपालिकेने स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या तिथे राहणाऱ्या व्यक्तीला  अथवा महिलेला योग्य ती पगार वाढ ही दिली पाहिजे व आरोग्याचा ठेका दिलेला ठेकेदाराकडून रोज प्रत्येक शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या अंत्यविधीचे ठिकाण हे त्यांना त्यांच्या पद्धतीने हवे तसे रोजच स्वच्छ नेहमी करता करून दिले पाहिजे. कोपरगाव ची लोकसंख्या आजूबाजूचे शहरालगेचे भाग शहराला नव्याने जोडले गेले असल्यामुळे वाढलेली आहे, वाढत आहे. कोरोना पासून मृत्युदर ही वाढलेले आहेत. अंत्यविधी झाल्या नंतर रक्षा विसर्जनाच्या ठिकाणी दत्तपाराच्या खाली गोदावरी नदी काठी मैला मिश्रित घाण सांडपाणी त्याच ठिकाणी येते. तरी रक्षा विसर्जनासाठी दुसरी जागा अमरधामलगत नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मैलामिश्रित सांडपाण्यात रक्षा विसर्जन होणार नाही. दशक्रिया विधी ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने महिलांसाठी व पुरुषांसाठीचे शौचालय तसेच कपडे बदलायचे जागा रोजच्या रोज स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच नगरपालिकेतील अडचणीन बाबत तिथे सेवा देणारे न्हावी समाज , ब्राह्मण गुरु यांचा सल्ला घेतला पाहिजे.
नगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे जनतेच्या वतीने नागरिकांनी मधील अडचण गैरसोय बाबत ही मागणी करावी लागत आहे. डेथ सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचे असल्याने . मृत व्यक्तीच्या नातलगांना सुईचे होण्यासाठी कोपरगाव येथील बाजार तळातील अमरधाम , बेट भागातील अमरधाम , कोर्ट जवळील जुने कब्रस्तान , १०५ मधील कब्रस्तान , टाकळी नाका येथील ख्रिश्चन स्मशानभूमी अशा या महत्त्वाच्या ठिकाणी मोठे फ्लेक्स माहिती पत्र लावून जनतेला दिलासा द्यावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाटील यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे